![]() |
अहमदाबाद येथे विमान दुर्घटना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
मुंबई : आज गुरुवार दिनांक १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळा जवळील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचा लंडन (गॅटकिक) या दिशेने निघालेला ड्रीमलाइनर Boeing 787 विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सुमारे दुपारी 2:17 वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत विमानात सुमारे 242 प्रवासी होते.
🚨 *घटना तपशील*
१) विमान टेकऑफनंतर लगेचच दुर्घटनाग्रस्त झालं, आणि मेघानीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात काळा धूर उठताना दिसला .
२) सुरुवातीच्या आकडेवारीनुसार 242 प्रवासी आणि चालक दलातील सदस्य हे विमानात होते .
३) अहमदाबाद विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आलं, आणि दुर्घटनास्थळी अग्निशमन, आपत्कालीन आणि पोलिस दल कार्यरत आहेत .
४) आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मृत्यू किंवा जखमांचा तपशील देण्यात आलेली नाही; तपासासाठी इकडे आयसीएएमपी, डीजीसीए, आणि इतर यंत्रणांचा समन्वय सुरू करण्यात आला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा