![]() |
शिरोळात दीपक मगदूम या युवकाचा खून |
प्रा..डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : दिपक दशस्थ मगदूम (वय २०, रा. शिवाजीनगर, शिरोळ, जि. कोल्हापूर) याचा दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करुन खून केला आहे. हा खून परवेझ शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळुंखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतिक सावंत, विनायक साळुंखे (सर्व रा. शिरोळ) यांनी केला आहे, अशा आरोपाची फिर्याद अमोल संतोष सावंत (रा. शिवाजीनगर, ता. शिरोळ) यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. ७ जणांविरुध्द भा.न्या.सं. कलम १०९, १८९ (१), १८९ (२), १८९ (४), १९०, ११५ (२), ३५२, ३५१ (२) या कलमाने गुन्हा नोंद झाला आहे, असं शिरोळ पोलीस ठाण्यातून सोमवारी सांगण्यात आलं.
अधिकृत सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार, अमोल सावंत, मयत दिपक मगदूम या दोघांना परवेझ शेख यांनी कुरूंदवाडला जायचं आहे, असं सांगून मोटारसायकलवरून नेलं. परवेझ शेख याने नदीवेस तीन तिकटीजवळ शिरोळ येथे रस्त्यावर आणि शेतात हातात दगड घेवून मारा याला असं म्हणत दिपक मगदूम याच्या डोक्यात आणि पाठीमागून हल्ला केला. यावेळी अमोल सावंत परवेझ शेखला धरुन बाजूला करत असताना परवेझ शेख याने अमोल सावंत याची गळपट धरुन हाताने मारहाण करुन शिवीगाळ करत तुला पण मारीन अशी धमकी दिली. यावेळी शेतात दबा धरून बसलेले रोहन कांबळे, प्रज्योत साळुंखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतिक सावंत, विनायक साळुंखे हे येथे आले. यावेळी प्रज्योत साळुंखे याने अमोल सावंत यांचा गळा दाबून तु मधे येवू नकोस असं म्हटलं आणि सावंत यांना बाजूला ओढलं. यावेळी परवेझ शेख, ऋषिकेश कांबळे, रोहन कांबळे, शुभम पाटील, प्रतिक सावंत, विनायक साळुंखे यांनी दिपक मगदूम याला शेतात ओढत नेवून दगडाने मारहाण केली.
रोहन कांबळे यांनी कोयत्याने दिपक मगदूम याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं गंभीर जखमी केलं. एवढं घडल्यानंतर पळत जाताना रोहन कांबळे याने त्याच्याजवळ असलेला कोयता सावंत यांना दाखवत तुला पण जीवंत सोडणार नाही, तुला नंतर बघून घेतो, अशी धमकी देवून निघून गेले. दरम्यान, दिपक मगदूम हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. शितल पालेकर यांनी सुरू केला आहे.
या घटनेने शिरोळ परिसरात दहशत पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा