Breaking

शुक्रवार, १३ जून, २०२५

*पोलीस निरीक्षक सत्यवान हाके उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित*


पोलीस निरीक्षक सत्यवान हाके उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार स्वीकारताना, अन्य पदाधिकारी व मान्यवर
 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : समर्थ सेवा फाऊंडेशन दानोळी संचलित, सहयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, तमदलगे  मार्फत मंगळवार दि. १० जून २०२५ रोजी सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कार्याबदल  पोलीस निरीक्षक सत्यवान हाके (जयसिंगपूर पोलीस ठाणे) यांना उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

   मा. संतोष कोळी (वरीष्ठ सहाय्यक पं. स. हातकणंगले) यांची बॅ.बाळासाहेब खर्डेकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सह. पत संस्था जयसिंगपूर या संस्थेच्या चेअरमनपदी निवड झालेबदल त्यांना व सहयोग व्यसन‌मुक्ती केंद्रामध्ये ॲडमिशन घेऊन जे वर्षभर व्यसनमुक्त राहीले त्या सर्व बांधवांना संस्थेमार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

       सदर प्रसंगी पुरस्काराचे मुख्य मानकरी मा.हाके यांनी आपल्या मनोगतात संस्थेने चालविलेल्या व्यसनमुक्ती केंद्रामुळे समाजात वाढणारी व्यसनाधिनता रोखण्यासाठी उत्कृष्ट कार्य होत असून त्यामुळेच व्यसनाधिन व्यक्तींना व्यसनमुक्त होऊन समाजात पुन्हा मानाचे स्थान व सन्मानाने जगण्याची संधी मिळत आहे  त्याबद्दल संस्थेला मनस्वी धन्यवाद दिले. तसेच संस्थेचे अध्यक्ष,श्री.सुशांत मल्लाडे यांनी मा.  सत्यवान  हाके यांच्या संपूर्ण प्रशासकीय व सामाजिक सेवेच्या कार्याची माहिती देवून संस्थेने चालविलेल्या व्यसनमुक्ती केंद्राच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

   सदर कार्यक्रमास मा.राम शिंदे (कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना), मा. डॉ. आण्णासाहेब पाटील (संस्थापक चेअरमन एस.पी विद्यानिकेतन), मा. श्री नेमगोंडा पाटील (मा. उपसरपंच, निमशिरगाव), मा.अमित उर्फ बबलू दळवी, मा.भिमराव भोसले, मा.सचिन उर्फ बंडू राऊत, मा.गणेश साळोखे,महेश दळवी (सर्व सामाजिक कार्यकर्ते दानोळी) व भूजगोंडा पाटील (ऑक्युप्रेशर थेरपिस्ट), मा. रघूनाथ माळी (सांगली), मा. अभिजित सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेवटी संस्थेचे संचालक डॉ.संतोषकुमार पाटील यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा