Breaking

रविवार, ८ जून, २०२५

*जयसिंगपुरात शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार पुस्तकांचे वितरण : मेघन देसाई*

 

जयसिंगपूर शहरात होणार मोफत पुस्तक वितरण


जयसिंगपूर  : शाळेच्या पहिल्याच दिवशी शहरातील ४५८२ विद्यार्थ्यांना २११०६ मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार असल्याची माहिती, पालिका शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख मेघन देसाई यांनी दिली. 

     देसाई म्हणाले, 'सर्व शिक्षा अभियानातून पुस्तकांचे वाटप होणार आहे. याशिवाय इंग्रजी माध्यम ५५८, कन्नड २१७ व ऊर्दू माध्यम ३२१ विद्यार्थी असे एकूण १०९६ विद्यार्थ्यांची सुमारे सहा हजार पुस्तकांची मागणी आहे. तालुकास्तरावरून संबंधित शाळांना पुस्तक वाटप सुरू असून येत्या दोन दिवसांत पुस्तके उपलब्ध होतील. पहिलीच्या ४२८ विद्यार्थ्यांना १२०० पुस्तके दिली जाणार आहेत. दुसरीच्या ४३२ विद्यार्थ्यांना १७२८, तिसरीच्या४७८ विद्यार्थ्यांना २३९०, चौथीच्या ४९४ विद्यार्थ्यांना २९१६, पाचवीच्या ७४१ विद्यार्थ्यांना ४४१०, सहावीच्या ६५६ विद्यार्थ्यांना ४०८१, सातवीच्या ८०४ विद्यार्थ्यांना ५४०४, आठवीच्या ७४० विद्यार्थ्यांना ४९७० पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

  नगरपालिकांच्या १० शाळांबरोबरच खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांना पहिल्या दिवशी पुस्तके वाटप करण्याचे नियोजन केले आहे. यंदापासून पहिलीसाठी सुरू केलेल्या सीबीएससी पॅटर्नप्रमाणे पुस्तके प्राप्त झाली आहेत. १६ जूनला लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करून पाठ्यपुस्तके, गणवेश व शूज वाटप केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा