Breaking

रविवार, ६ जुलै, २०२५

विठुनामाच्या गजरात अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहाने साजरी


आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी विठ्ठल रुक्माई च्या वेशभूषेत

*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर :  येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आषाढी एकादशी उत्साहाने साजरी केली. 

     याप्रसंगी शाळेतील इंग्रजीच्या अध्यापिका शर्वरी देशपांडे यांनी विठू माऊलीचे सुंदर गाणे सादर केले. मराठीच्या अध्यापिका स्वाती शिंदे यांनी मुलांकडून समता, शिक्षण आणि स्वच्छता याबाबतीत वारी आणि संतांनी दिलेल्या शिकवणुकीवर सुंदर बालनाटिका बसवून घेतली. शाळेतील  तीर्थ मोहिते,दर्शन पाटील,अंश वनकोरे, अर्णव हंजी, अथर्व काळे, आभाश पाटील, मंथन बुर्ले, संनिधी मगदूम, अदिती खंडारे, तनुजा हडपत,सई कांबळे आणि राघवेंद्र कित्तूर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नाटिकेचे अतिशय सुंदर सादरीकरण केले. शाळेच्या कला शिक्षिका साक्षी चौगुले यांनी काढलेल्या विठ्ठलाच्या अतिशय सुंदर रेखाटनाने आणि पालखीच्या या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला.

    शाळेतील सर्व विद्यार्थी विठ्ठल-रखुमाई ,वारकरी, विविध संत अशा विविध आणि पारंपारिक वेशभूषा करून सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी झाले. पालखी सोहळा, रिंगण, फुगडी आणि विठू नामाचा गजर असा सोहळा साजरा करून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मराठमोळ्या वारकरी संप्रदायाची आणि संस्कृतीची ओळख करून दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा