![]() |
मार्गदर्शन करताना PI सत्यवान हाके, अध्यक्षस्थानी डॉ. सुरत मांजरे व प्रा.राजेंद्र कोरे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : "विद्यार्थी हा राष्ट्र व समाज विकासाचे उज्वल भविष्य असून त्याने व्यसनमुक्ती पासून दूर राहिलं पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक परीक्षा व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित करून यशस्वी ध्येय प्राप्ती करता येईल असे मत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी प्रतिपादित केले.ते जयसिंगपूर कॉलेज येथे दिनांक २२ जुलै २०२५ रोजी आयोजित व्यसन मुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते.
हाके पुढे म्हणाले ,विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा, आत्मशिस्त व कठोर या त्रयी सूत्रीची अंमलबजावणी केली पाहिजे. याप्रसंगी व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, वेळेचे व्यवस्थापन करावे आणि शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारण्याचा सुतोवाच केला.
स्वागत व प्रास्ताविक प्रा.राजेंद्र कोरे यांनी केले, तर उपप्राचार्य प्रा.भारत आलदर यांनी आभार मानले. कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा