![]() |
मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. वर्षा शिंदे व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मध्ये व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : शिक्षण, आरोग्य आणि कौशल्याधारित प्रशिक्षण ही गुणवत्तापूर्ण मानवी भांडवल निर्मितीची मूलतत्त्वे असून, याच्या माध्यमातून भारताचे सामर्थ्य अधिक बळकट करता येते, असे स्पष्ट मत दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजीच्या प्रा.डॉ. वर्षा शिंदे यांनी व्यक्त केले. त्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त अर्थशास्त्र विभाग आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते.
प्रा.डॉ. शिंदे पुढे म्हणाल्या, “भारतीय अर्थव्यवस्थेत मानवी भांडवल सक्षम करण्याची अफाट क्षमता असून त्यासाठी राजकीय स्तरावर दृढ इच्छाशक्ती आवश्यक आहे. भविष्यात भारत हे कौशल्यपूर्ण आणि गुणवत्ताधारित मानवी भांडवल निर्माण करणारे आघाडीचे राष्ट्र ठरेल, याबाबत दुमत नाही.”
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, “मानवी भांडवलाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमधून कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे.”
कार्यक्रमात मानव्य विद्याशाखा प्रमुख प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, IQAC कॉर्डिनेटर.डॉ. तुषार घाटगे, पर्यवेक्षक प्रा.डॉ. महावीर बुरसे व प्रा. एस. व्ही. बस्तवाडे यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सोनाली साळुंखे यांनी करून दिला तर आभार प्रा.डॉ. वंदना देवकर यांनी मानले. सुत्रसंचालन रफिया रांगोळे हिने केले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, प्रा.डॉ. शशांक माने, प्रा.डॉ. सुजाता पाटील व अर्थशास्त्र विभागातील प्रा. विश्रांती माने, प्रा. ज्योती चोपडे, तसेच सिनियर व ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा