![]() |
सुयेकचे अध्यक्ष व उपप्राचार्य डॉ. जालिंदर यादव मार्गदर्शन करताना सोबत प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त श्री. बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात अर्थपूर्ण व्याख्यान
आटपाडी, दि. ११ जुलै : “भारतातील वाढती लोकसंख्या ही समस्या नसून देशाच्या विकासासाठी एक मोठी संधी आहे. तिचा योग्य प्रकारे वापर करून भारत जागतिक महासत्ता बनू शकतो,” असे स्पष्ट मत सुयेकचे विद्यमान अध्यक्ष व उपप्राचार्य डॉ. जालिंदर यादव यांनी व्यक्त केले.ते श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद, कोल्हापूर व अग्रणी महाविद्यालय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
डॉ. यादव यांनी ‘भारतीय लोकसंख्या आणि विकसित भारत’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की, “लोकसंख्या ही कोणत्याही देशाची संपत्ती असते. भारताकडे प्रचंड तरुण मनुष्यबळ आहे. या मनुष्यबळाला योग्य शिक्षण, कौशल्यविकास, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी दिल्यास तीच लोकसंख्या देशाच्या आर्थिक प्रगतीचे मुख्य साधन ठरू शकते.”
ते पुढे म्हणाले, “जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये लोकसंख्या घटते आहे. चीन, जपान, अमेरिका यांसारख्या देशांना श्रमशक्तीचा मोठा अभाव जाणवतो आहे. अशा स्थितीत भारताला जागतिक श्रमबाजारात महत्त्वाची भूमिका बजावण्याची मोठी संधी आहे.”
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना डॉ. शिवाजीराव भोसले म्हणाले की, “भारतीय लोकसंख्या ही एक विशाल बाजारपेठ तयार करत असून त्याचा उपयोग करत अनेक देश भारताशी व्यापारसंधी शोधत आहेत. त्यामुळे लोकसंख्या ही केवळ आकडेवारी नसून जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताच्या स्थानाचा मुख्य आधार आहे.”
कार्यक्रमास वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. के. बी. जाधव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा कुलकर्णी, प्रा. शकुंतला कुंभार, डॉ. हणमंत सावंत, डॉ. मंगल मारकड, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा