Breaking

रविवार, ६ जुलै, २०२५

*जयसिंगपूर बस स्थानकाच्या आवारात खेळला जातोय ऑनलाइन जुगाराचा डाव ;पोलिसांना एक आव्हान*

 

बस स्थानकाच्या आवारात ऑनलाइन जुगार


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  येथील बस स्थानक व बागेच्या कट्ट्यावर बसून चार-पाच जण एकत्र होऊन ऑनलाईन मोबाईलवर भर चौकात पैसे लावून जुगाराचा डाव खेळला जातो.बस स्थानकात येणारी प्रवासी तसेच कोल्हापूरकडे व सांगली मिरज कडे जाणारे अनेक वाहनधारक तसेच हजारो प्रवासी व  भागातील लोक बघून म्हणतात गल्लीबोळात घरात जुगार खेळलेले वेगळे हा तर  हजारो प्रवासांच्या व वाहनांच्या डोळ्यादेखत भरस्त्यावर जुगाराचा डाव मांडलाय याकडे पोलिसांचे लक्ष नाही का पोलिसांना दिसत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

   आपण कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली जुगाराचे क्लब पाहिले आहेत. घराच्या चार भिंतीच्या आत असणाऱ्या वर पोलिसांची कारवाई होते अशा अनेक बातम्या आपण वृत्तपत्र व अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिले आहे.सांगली-कोल्हापूर रोडवरील जयसिंगपूर बस स्थानकाच्या कट्ट्यावर व बागेच्या कट्ट्याच्या भिंतीवर मोबाईल वर  चक्क  पैसे लावून जुगाराचा डाव सुरू केला आहे. ते हि हजारो लोकांच्या डोळ्यादेखत हे एक नूतन जिल्हा पोलीस प्रमुख, जयसिंगपूर उप विभागीय पोलीस अधिकारी व जयसिंगपूर पोलीस ठाणे यांना एक आव्हान असल्याची चर्चा नागरिकांच्या मध्ये सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा