![]() |
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रा. राजमल जैन |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी (यूके)चे फेलो प्रा. राजमल जैन यांच्या "इंडियन इन टू स्पेस" या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानांद्वारे ते अर्जुननगर, कोल्हापूर, सांगली आणि जयसिंगपूर येथील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना अवकाश संशोधन, खगोलशास्त्र व वैज्ञानिक प्रगतीबाबत मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढवण्याच्या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, संशोधनाच्या क्षेत्रात करिअरसाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे.
व्याख्यानांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
१) सोमवार दिनांक २८ जुलै, सकाळी ११ वा. – देवचंद कॉलेज, अर्जुननगर
२) मंगळवार दिनांक २९ जुलै, दुपारी ३ वा. – पदार्थविज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
३) बुधवार दिनांक ३० जुलै, सकाळी ११ वा. – कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली
४) गुरुवार दिनांक ३१ जुलै, सकाळी ११ वा. – जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
या व्याख्यानमालेत भारताच्या अवकाश संशोधनातील प्रगती व भविष्याचा वेध घेतला जाणार असून, विज्ञानप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा