Breaking

सोमवार, १४ जुलै, २०२५

*विवेकानंद महाविद्यालयात ई-पोस्टर स्पर्धा ; विद्यार्थ्यांची लोकसंख्यावाढी विषयी अभ्यासपूर्ण मांडणी*


लोकसंख्याविषयक पोस्टर प्रदर्शन


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक असोसिएशन (SUEAK) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. कैलास पाटील उपस्थित होते.

        या स्पर्धेत बी.ए. व बी.कॉम. शाखेतील विद्यार्थ्यांनी लोकसंख्या वाढीशी संबंधित विविध सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय पैलूंवर आधारित विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून लोकसंख्येच्या वाढीचे परिणाम आणि उपाय योजनांवर प्रकाश टाकणारी पोस्टर्स सादर झाली.

    अध्यक्षीय भाषण करताना डॉ. कैलास पाटील म्हणाले,  लोकसंख्यावाढ ही देशासमोरील गंभीर समस्या असून त्यावर युवकांनी सजगतेने विचार करावा, असे आवाहन केले.

   सदर स्पर्धेचे परीक्षण सौ. सई पाटील (गृहविज्ञान विभाग) आणि डॉ. सोमनाथ काळे यांनी केले. शंकरनाग सरणायकर (बी.ए. भाग १) याला प्रथम, संजना पाटील (बी.ए. भाग १) हिला द्वितीय, तर अदिती अस्वले (बी.कॉम. भाग १) हिला तृतीय क्रमांक मिळाला.

   प्रारंभी डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रदर्शन आश्विनी गीते यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खतिजा किल्लेदार हिने केले. 

    या प्रसंगी डॉ. संदीप पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा