Breaking

मंगळवार, १५ जुलै, २०२५

*युवकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे दूत बनून समाज व राष्ट्र कार्यासाठी कटिबद्ध व्हावे : संचालक डॉ. टी. एम. चौगले यांचे आवाहन*

 

मार्गदर्शन करताना  उद्घाटक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक, डॉ. टी. एम. चौगले,प्रा.डॉ.एस.एम. गायकवाड, सुरेखा आडके, संचालक प्रा. आप्पासो भगाटे,प्राचार्य डॉ. सुरत मांजरे

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर (प्रतिनिधी) : "आपत्ती व्यवस्थापन हे सुरक्षित व मानव केंद्रित समाज निर्माण करण्याचे प्रभावी साधन असून युवकांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन समाज व राष्ट्र कार्यासाठी कटिबद्ध व्हावे," असे प्रतिपादन संचालक डॉ. टी.एम. चौगले यांनी केले.

   शिव सहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा  जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरमध्ये सोमवार दि.१४ जुलै, २०२५ रोजी पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी.एम.चौगले व शिव सहायता आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूरचे डॉ.एस.एम. गायकवाड होते.तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते.

   याप्रसंगी प्रा.डॉ. गायकवाड यांनी बीज भाषणामध्ये आपत्ती काळात प्रशासन, महाविद्यालय, समाज व विद्यार्थ्यांमध्ये साखळी निर्माण होण्याची गरज व्यक्त केली. प्राचार्य डॉ. मांजरे यांनी युवकांमध्ये राष्ट्रसेवेची भावना निर्माण होत असल्याचे सांगितले.

         कार्यशाळेत दिनकर कांबळे (जीवरक्षक), सत्यजित देसाई (समुपदेशक), योगेश अग्रवाल (यशोदर्शन फाउंडेशन), रफिक नदाफ (सांगली महापालिका)एन.डी. आर.एफ,सांगली व जयसिंगपूर नगरपरिषद अग्निशमन पथकाचे अधिकारी मोहन पाटोळे व त्यांच्या टीमने  विविध सत्रांमधून उपयुक्त मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दिली.

      याप्रसंगी प्रा.डॉ. शैलजा बिडकर व दोन विद्यार्थ्यांनीनी सकारात्मक मनोगत व्यक्त केली.

   या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रभाकर माने, सूत्रसंचालन डॉ. श्रीदेवी नकाते व डॉ. सुजाता पाटील, तर आभार डॉ. खंडेराव खळदकर व डॉ. आर.डी.माने यांनी मानले. या कार्यशाळेत स्थानिक संस्था अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, प्रा. आप्पासो भगाटे व  विद्यापीठ डी.एस.डब्ल्यू. विभागाचे अधीक्षक मा.सुरेखा आडके उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व संघ व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यशाळेचे उत्कृष्ट आयोजन प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कार्य समिती मधील सर्व प्राध्यापकवृंद, IQAC समन्वयक डॉ. तुषार घाटगे, उपप्राचार्य प्रा.डॉ. एम. व्ही.काळे, प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, कार्यालीयन अधीक्षक संजय चावरे व प्रशासकीय सेवक कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा