Breaking

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व भौतिक साधनांचा समन्वय आवश्यक – प्राचार्य डॉ. सुरत मांजरे

 

प्राचार्य डॉ. सुरत मांजरे विद्यार्थ्यांसमोर अभिभाषण करताना

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : "विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा व भौतिक साधनांचा समन्वय साधत ज्ञान, कौशल्य आणि मानवी मूल्यांचा विकास करून घ्यावा," असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले.  शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या सत्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

    प्राचार्य डॉ. मांजरे यांनी सीनियर व ज्युनिअर विभागातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी स्वतंत्रपणे अभिभाषण करून विद्यार्थ्यांना ज्ञानसाधनेबरोबरच व्यावहारिक जगाशी नाळ जोडण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, "हे अभिभाषण आमच्यासाठी अभिवचन आहे," अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

       या सत्रारंभ कार्यक्रमाला कॉलेजचे सर्व शाखाप्रमुख प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. डॉ. एस.एस. महाजन, डॉ. एस.आर. नकाते, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. टी.जी. घाटगे, प्राध्यापकवृंद, कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा