![]() |
जी. के.जी. घोडावत कन्या महाविद्यालयात वृक्षारोपण करताना प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर ,डॉ. प्रभाकर माने,डॉ. संदीप रावळ व प्रा.डॉ. पंडित वाघमारे व प्रा.डॉ.बदामे |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
जयसिंगपूर : पर्यावरण संवर्धनासाठी आणि हरित जयसिंगपूरच्या निर्मितीसाठी जी. के.जी. घोडावत कन्या कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर आणि प्रा. डॉ. प्रभाकर माने यांच्या हस्ते कलमी आंब्यांची रोपे लावून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात एकूण २५ कलमी आंब्यांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. मिणचेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, “वृक्षारोपण हा केवळ उपक्रम नसून, भविष्यासाठी दिलेला जिवंत वारसा आहे. झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे.” त्यांनी मानसशास्त्रज्ञ, सामाजिक सुधारक आणि संतांच्या पर्यावरणाबाबतच्या विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी आवाहन केले.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप रावळ, प्रा. डॉ. पंडित वाघमारे उत्तम नियोजन केले. प्रा. डॉ. बदामे, प्रा. गणेश कुरळे तसेच एनएसएस स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी उत्साहात रोपांची लागवड करून “प्रत्येक झाड म्हणजे एक श्वास” हा संदेश दिला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेमाची बीजे रोवणारा ठरला असून, पुढील काळात अधिकाधिक झाडे लावून आणि वाढवून परिसर हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा