![]() |
विद्यार्थी सहायता जनजागृती अभियानात मार्गदर्शन करताना बार्टीचे शासन प्रतिनिधी सुनंदा मेटकर, संस्था संचालक अप्पसाहेब भगाटे, अशोक शिरगुप्पे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करून शासन, विद्यार्थी व समाज यांच्यात अनुकूल समन्वय निर्माण करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या वतीने आज दिनांक २० ऑगस्ट, २०२५ रोजी "विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान" जयसिंगपूर कॉलेजमध्ये राबविण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून शासन प्रतिनिधी सुनंदा मेटकर (बार्टी) उपस्थित होत्या.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते. संस्था सदस्य अशोक शिरगुप्पे व प्रा. आप्पासो भगाटे याप्रसंगी उपस्थित होते.
सुनंदा मेटकर यांनी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत व TRTI या संस्थाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक,स्पर्धा परीक्षा, विदेशी शिक्षण व अन्य योजनांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे दाखले, नवीन मतदारासाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देणे, आधारकार्ड अद्ययावत करणे, जात पडताळणी, महाडीबीटी इत्यादी सुविधांच्या लाभांची माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाच्या हे अभियान असून याद्वारे विद्यार्थ्यांना विविध विषयांची सांगोपांग व वास्तव माहिती मिळते तसेच समाजातही त्याचा सकारात्मक व योग्य संदेश पोहोचतो. त्यासाठी मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडून या कार्यक्रमाची रुपरेषा आखली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सदर कार्यक्रम विद्यार्थी विकास विभाग, बी.सी.सेल व मा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्तपणे दोन सत्रात संपन्न झाला.पहिल्या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. शशांक माने यांनी केले. तर आभार डॉ. एस.आर. तापकीर यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पी.टी. माने यानी केले.
दुसऱ्या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. आर.डी. माने यांनी केले. तर आभार डॉ. एस.आर. पाटील यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.व्ही.एच.शिंदे यानी केले.
या कार्यक्रमास शिरोळचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत काळे, महसूल सेवक सचिन झेंडे, महा-इ-सेवा केंद्राचे प्रवीण कोळी व राजकुमार पाटील,प्रा.डॉ.एस.एस. महाजन प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, डॉ.एस.आर.नकाते, कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, सर्व प्राध्यापकवृंद व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा