![]() |
श्री क्षेत्र रामलिंग वनक्षेत्रातून प्लास्टिकचे संकलन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग जयसिंगपूर कॉलेज |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
जयसिंगपूर : धार्मिक पर्यटन केंद्रे स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने मौजे आळते (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील प्रसिद्ध श्री रामलिंग देवालय वनक्षेत्रात प्लास्टिकमुक्ती स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत २९ स्वयंसेवकांनी परिसरातील प्लास्टिक रॅपर्स, बाटल्या व अन्य कचरा गोळा करून साधारण अर्धा ट्रॉली इतके प्लास्टिक मौजे आळते ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले. ग्रामस्थ, दुकानदार आणि मुख्य पुजारी गुरव यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात परिसरात स्वच्छतेचा संदेश दिला गेला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि नैसर्गिक वनक्षेत्र स्वच्छ ठेवण्याचे आवाहन एनएसएस विभागाने यावेळी केले. या उपक्रमामुळे प्लास्टिकमुक्तीचा संदेश पर्यटक व स्थानिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम एन.एस.एस. विभागाने केले.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांची प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या शिबिरात कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. प्रभाकर माने, प्रा. गणेश कुरळे, प्रा. सत्यजित माने व एनएसएस प्रतिनिधी अग्रजा कांबळे व एन. एस.एस.चे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा