![]() |
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून प्रसिद्ध धन्वंतरी व संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एन.सी.सीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे स्थळ अटल टिकरिंग लॅब येथे निश्चित करण्यात आले आहे. कॉलेजमधील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
रक्तदान हे मानवी जीवन वाचविण्याचे सर्वात मोठे दान असल्याचे सांगत, अधिकाधिक लोकांनी या समाजोपयोगी कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा