![]() |
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवताना प्रा. कल्पना पाटील व विद्यार्थीनी |
प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी कनिष्ठ विभागातील अकरावी आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याची एक दिवशीय कार्यशाळा बटरफ्लाय गार्डन येथे उत्साहात पार पडली.
कार्यशाळेच्या प्रारंभी पर्यावरण शिक्षिका कल्पना पाटील यांनी पर्यावरणपूरक मूर्तींचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ध्वनी व जल प्रदूषण टाळून प्रत्येक सण हरित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शाडू माती व देशी बियांचा वापर करून मूर्ती कशी तयार करावी, तसेच तिचे विसर्जन घरच्या घरी कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत शाडूच्या मूर्ती साकारल्या.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनामुळे विहीर,तलाव,नदी व अन्य पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत असतात.त्याचा जैव साखळीला धोका पोहोचतो. अशा कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणपती निर्मितीमुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकता येते.
या कार्यशाळेस उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, अधीक्षक संजय चावरे, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा