Breaking

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

*"नो साऊंड – नो लेझर" अभियानातून जनजागृती : पिंटू मगदूम फार्मसीचा सामाजिक उपक्रम*


अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती यांच्या वतीने ध्वनी व लेझर प्रदूषणाविरोधात जनजागृती रॅली


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती यांच्या वतीने ध्वनी व लेझर प्रदूषणाविरोधात जनजागृती रॅलीअनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती यांच्या वतीने ध्वनी व लेझर प्रदूषणाविरोधात जनजागृती रॅलीअनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती यांच्या वतीने ध्वनी व लेझर प्रदूषणाविरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली.

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हातात संदेशफलक घेऊन जयसिंगपूर शहरातून ही रॅली काढली. “नो साऊंड – नो लेझर” अशा घोषवाक्यांनी सजलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. आगामी गणेशोत्सवात सार्वजनिक सण साजरा करताना सामान्य नागरिक, वृद्ध व आजारी व्यक्तींना ध्वनी व लेझर प्रदूषणाचा त्रास होणार नाही यासाठी समाजाने सजग राहावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

   ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांच्या प्रेरणेतून व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका कु. मानसी झाडे यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा