![]() |
भित्तीपत्रक उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.एस.जी. संसुद्धी, अध्यक्षस्थानी प्रा. वर्षा शिंदे व अन्य मान्यवर |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : सृजनशीलता व कल्पकतेवर सजलेले हे वॉलपेपर विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे स्थान असल्याचे मत हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.जी.संसुद्धी यांनी व्यक्त केले. ते जयसिंगपूर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभाग आयोजित भित्तीपत्रक उद्घाटन कार्यक्रमात बोलताना होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. वर्षा शिंदे उपस्थित होत्या.
अर्थशास्त्र विषयाच्या एम.ए.भाग २ या वर्गातील विद्यार्थ्यांनी भारतीय अर्थव्यवस्था, मौद्रिक अर्थशास्त्र व अन्य अर्थशास्त्रीय विचारांच्या धर्तीवर भित्तीपत्रके सादर करण्यात आली. यावेळी प्रा.डॉ.एस.जी.संसुद्धी यांच्या हस्ते भित्तीपत्रक उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
अध्यक्षीय भाष्य करताना प्रा. शिंदे म्हणाल्या, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकाची उत्तम निर्मिती करून त्याचा आशय उत्तम व प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून स्पष्ट केला आहे. भविष्यात ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) च्या आधारा घेऊन नवीन कल्पकता व नव विचारांना स्फूर्ती देणारे ऊर्जेचे व प्रेरणेचे उत्तम प्रतीक आहे.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांची प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर माने, प्रा.डॉ. वंदना देवकर, प्रा. विश्रांती माने,प्रा. मेहबूब मुजावर व प्रा. गणेश कुरळे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक कु. निकिता शहापुरे यांनी केले. आभार कु. अंजली माळी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रफिया रांगोळे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा