![]() |
शिबिरात मार्गदर्शन करताना रोटरीचे क्लबचे सचिव कोमल पॅट्रो, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदर्शन एडवान,राजेंद्र चौगुले, संतोष माने व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये रोटरी क्लब व नयनतारा ऑप्टिकल्स जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात तब्बल ५२४ विद्यार्थ्यांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
गुरुवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. सुदर्शन एडवान यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबचे खजिनदार राजेंद्र चौगुले, पदाधिकारी व नयनतारा ऑप्टिकल चे प्रमुख संतोष माने उपस्थित होते.
रोटरी चे क्लबचे सचिव कोमल पॅट्रो मार्गदर्शन करताना म्हणाले, नेत्र हे त्याच्या शरीराचा मुख्य आरसा असून प्रत्येक व्यक्तीचे डोळे निरोगी असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालय विद्यार्थ्यांचे मोफत डोळे तपासणी करून वेळेत त्याचे महत्व व गांभीर्य ओळखून डोळ्याची काळजी घेण्याबाबत आवाहन केले.
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मांजरे म्हणाले, “मनुष्याला अंधपणाने जगणे अत्यंत कठीण आहे. आजच्या डिजिटल युगात वाढत्या स्क्रीन टायमिंगमुळे डोळ्यांचे आजार वाढत आहेत. त्यामुळे वेळीच तपासणी करून आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
शिबिराचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. एस. एस. महाजन यांनी केले. प्रा. डॉ. एस. जी. संसुद्धी यांनी आभार मानले. तर कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी सूत्रसंचालन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत आयोजित या शिबिराला ऑप्टोम पवन चव्हाण, गणेश निगडी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, प्रा. डॉ.विजयमाला चौगुले, डॉ. एस. आर. नकाते, कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर ,अधीक्षक संजय चावरे व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा