![]() |
जयसिंगपूर बस स्थानकाची पाहणी करताना अधिकारी व डॉ. दगडू माने यांचा सत्कार करताना सर्व मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : महाराष्ट्र शासनाच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जयसिंगपूर बसस्थानकाला भेट देऊन तपासणी केली. यावेळी बसस्थानक परिसर, शौचालये, पिण्याचे पाणी, बस वेळापत्रक, सवलत दरपत्रक, बागबगीचा, फलाटावरील माहितीफलक, तसेच एकूणच स्वच्छता याबाबत सविस्तर पाहणी करण्यात आली आणि प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व गरजा जाणून घेण्यात आल्या.
कुरुंदवाड आगार प्रमुख नामदेव पतंगे यांनी पाहणी पथकाचे स्वागत केले. पाहणी दरम्यान प्रादेशिक व्यवस्थापिका यामिनी जोशी आणि अधिकारी एस. पाटील यांनी प्रवासी सुविधा सुधारण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. दगडू माने आणि उत्कृष्ट सेवेसाठी गौरवण्यात आलेले रोटरी क्लबचे डॉ. अतिक पटेल यांचा यामिनी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बसस्थानक प्रमुख राज कारेकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र भोसले, वरिष्ठ लिपिक राहुल कोळी, रोहन मुळीक, वाहतूक नियंत्रक तानाजी कांबळे, दादासो करमरे, प्रमोद हेरवाडे, नवनाथ वाकदकर, किशोर शिंगाडे, निनाद भोसले, प्रवासी मित्र शिवगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा