![]() |
जयसिंगपूर नगरपरिषद, जयसिंगपूर |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
जयसिंगपूर : शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदे कडून कचरा उठावासाठी घंटागाडीची व्यवस्था केली असली तरी अलीकडे या सेवेमध्ये प्रचंड अनियमितता दिसून येत असून नागरिकांच्या रोषाला घंटागाडी चालक व नगरपरिषदेला सामोरे जावे लागत आहे.
नगरपरिषदेकडून खासगी कंपनीमार्फत कचरा उठावाचे टेंडर देण्यात आले होते. सुरुवातीला काम नियमितपणे सुरू असले तरी मागील दोन महिन्यांपासून गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. अनेक वार्डांत दिवसेंदिवस कचरा साचत असून नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. झोपडपट्टी भागातील नागरिकांना थेट तक्रार नोंदवणे कठीण असल्याने रोष घंटागाडी चालकावर निघतो. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्या वार्डात गाडी पोहोचली नाही याची पूर्वकल्पना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला माहित असूनही नगरपरिषद तक्रार आल्यानंतरच कारवाई करते. एकेकदा इतर वार्डातील गाडी फिरवून तात्पुरता उपाय केला जातो, मात्र त्यामुळे नियमिततेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जयसिंगपूर नगरपालिकेच्या या स्वच्छतासेवा कार्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे.
शासनाच्या “स्वच्छ शहर – सुंदर शहर” व स्वच्छ महाराष्ट्र अभियान या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून कचरा उठावासाठी ठोस, शिस्तबद्ध आणि नियमित व्यवस्था अपेक्षित असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा