Breaking

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

*जयसिंगपूरच्या अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न ; १३ लाभांश जाहीर*


२९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. के.बी.पाटील, संस्थापक संचालक डॉ. सुभाष अडदंडे व अन्य मान्यवर 


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जयसिंगपूर ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी जयसिंगपूर कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.

     प्रारंभी अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.के.बी.पाटील यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. प्रास्ताविकेच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. पतसंस्थेचे संस्थापक डॉ. सुभाष अडदंडे यांनी पतसंस्था स्थापनेमागचा हेतू  स्पष्ट करीत पतसंस्थेच्या सक्षमीकरणासाठी समग्र दृष्टिकोन मांडला.

       पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन प्रा.पी.सी.पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला. पतसंस्थेचे मॅनेजर राहुल पाटील यांनी २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर विषय पत्रिकेवरील विषय मांडले. त्यास सभासदांनी सर्वानुमती मंजुरी दिली. 

       यावेळी अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उत्कर्षा उषा उत्तम सुतार तिचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ सर्वसाधारण महिला प्रवर्गातून राज्यात १४ वी रँक ने यश मिळवून विक्रीकर निरीक्षक आता STI पदी निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार डॉ. सुभाष अडदंडे यांच्या हस्ते करण्यात आला. पतसंस्थेचे हितचिंतक श्री. ए. ए. रायनाडे, सिनिअर अभियंता शिरीष पाटील,पी.ए.मगदूम, संचालक,लक्ष्मणराव चौगुले, डॉक्टर निखिल मगदूम, कुंभार गुरुजी, ऑडिटर सीए नितीन कोरुची, ॲड. बी.बी.मगदूम, उत्तम सुतार व उषा सुतार यांना बुके देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

    महाविद्यालयाचे आजी-माजी प्राध्यापक डॉ. दीपक चांदणे, प्रा.एस.बी.पाटील,प्रा.सी.बी. कुलकर्णी, आय आर पाटील, अजित पाटील, माजी अधीक्षक संजीव मगदूम, अविनाश पाटील, बेदे साहेब व मधुकर कांबळे यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

     या सभेचे आभार संचालिका प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

     या सभेस तज्ञ संचालक महावीर पाटील, अभिजीत अडदंडे, प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, संचालक प्रा.एम.एस.पाटील, संजय चावरे, सुहास हिरुकडे, प्रदीप सुतार, सुनील कणसे व हिरालाल पवार उपस्थित होते. सदर सभेस सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात व खेळेमिळीच्या वातावरणात संपन्न झाली.

       ही सभा यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक राहुल पाटील, कॅशियर सुधाकर पाटील, कुबेर गायकवाड व मंदा बोटांगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा