![]() |
छ.शिवाजी चौक मित्र मंडळ कार्यकर्ते |
साळवण - प्रतिनिधी - अमित भोसले
कोल्हापूर - गोवा महामार्गावर आसगाव ते गगनबावडा पर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. काही वर्षांपासून महामार्गाचे सुरू असलेले काम अद्यापही रखडलेलेच आहे. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे याकडे लक्ष नाहीये. सर्व प्रवाशांसोबत विशेषकरून विद्यार्थी, शेतकरी तसेच स्थानिक कर्मचारी वर्गाचे यामध्ये हाल होत आहेत.
व्हिडिओ पहायातच बुधवारी साळवण पुलावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे एकाच दिवशी दोन अपघात झाले व यामध्ये लहान बालकांसह इतरांना गंभीर इजा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांचे अपघात रोखण्यासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी छ. शिवाजी चौक मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःहून ते खड्डे मुजवले.
याचे सर्व स्तरातून कौतुक होत असले तरी, लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी या मंडळाने सरकारला केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा