![]() |
राष्ट्रीय हिंदी दिवस कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. अंजना चौगुले चावरे व प्राचार्य प्रिया गारोळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जयसिंगपूर कॉलेजच्या हिंदी विभागाच्या प्रा. अंजना चौगुले उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रिया गारोळे उपस्थित होत्या.
मार्गदर्शन करताना प्रा. चौगुले म्हणाल्या की, “मनुष्य अपनी मातृभाषा और राष्ट्रभाषा दोनों का उपयोग करके जीवन समृद्ध कर लेता है. हिंदी कश्मीर से कन्याकुमारी तक, साहित्य से सिनेमा तक संवाद बनाने वाली और दिल से बोली जाने वाली भाषा है.” हिंदीचे महत्त्व त्यांनी गोष्टी आणि गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हिंदी अध्यापिका ज्योत्स्ना पाखरे यांनी केले. यावेळी शाळेतील हिंदी अध्यापिका शिवानी घाटगे व समाजशास्त्राचे प्रा. सुहास समडोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हिंदी अध्यापिका जैनब जमादार यांनी केले.
हिंदी दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन ज्योत्स्ना पाखरे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा