Breaking

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

*जयसिंगपूरच्या घोडावत कन्या महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*

 

घोडावत कन्या कॉलेज येथे रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली आणि श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर या दोन्ही संस्था शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्यातही नेहमीच आघाडीवर आहेत. त्याच परंपरेत, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, दि. १५ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना व एनसीसी विभागामार्फत महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

   या शिबिरात विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासण्या घेऊन रक्तदानाचे महत्त्व समजावण्यात आले. प्रमुख पाहुणे शाश्वत ब्लड बँक, सांगली येथील डॉ. रमेश शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे सामाजिक मूल्य पटवून दिले. डॉ. सौ. नम्रता कल्याणी व डॉ. सौ. वर्षा कांबळे यांनी मार्गदर्शनासह रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली.

   महाविद्यालयातील विद्यार्थिनींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्राचार्य प्रा. डॉ. विकास मिणचेकर यांनी अध्यक्षीय भाषणात, “स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, परंतु शारीरिक आरोग्याकडे उदासीन असते; रक्तदानाबद्दल कोणताही गैरसमज न ठेवता समाजोपयोगी कार्यात सामील व्हा,” असे आवाहन केले.

    या उपक्रमात ४० जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना प्रा. डॉ. संदीप रावळ यांनी केली तर प्रा. डॉ. पंडित वाघमारे यांनी आभार मानले. शिबिराला लठ्ठे पॉलिटेक्निक, बळवंतराव झेले हायस्कूल, आयटीआय दतवाड, बलदवा इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षक, माजी विद्यार्थिनी, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा