Breaking

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

 

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. सुरज मांजरे, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, अधीक्षक संजय चावरे व मान्यवर प्राध्यापक

*गीतांजली जाधव : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अदिराज दीपक हजारे (बॉक्सिंग), कु. श्रेया अशोक केसकर (धनुर्विद्या) व कु. सोनाली सुभाष जाधव (तलवारबाजी) यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

   दरम्यान, तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत निसर्ग कृष्णा मडिवाळ याने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

    विद्यार्थ्यांच्या या यशामागे कॉलेजचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, अधीक्षक संजय चावरे, उपप्राचार्य बी.ए. आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षिका सौ. अमृता पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले.

    संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा