Breaking

मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

*जयसिंगपूर नगरपरिषदेतर्फे गणेशमूर्ती दान उपक्रम : ८ ठिकाणी कृत्रिम विसर्जन जलकुंड व्यवस्था*

 

जयसिंगपूर नगरपरिषद, जयसिंगपूर(पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व गणेशमूर्ती दान उपक्रम)


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा हेतू लक्षात घेऊन जयसिंगपूर नगरपरिषदेतर्फे यंदा ही  पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम जलकुंडात व्हावे तसेच निर्माल्य संकलित व्हावे, यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कुंडाची सोय करण्यात आली आहे.

    मुख्याधिकारी टीना गवळी व उपमुख्याधिकारी प्रमिला माने यांनी आवाहन केले की, “गणेश भक्तांनी पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम जलकुंडातच घरगुती मूर्ती विसर्जन करून नगरपरिषदेला सहकार्य करावे.”

    नगरपरिषदेने मंगळवार, दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी खालील ८ ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची व्यवस्था केली आहे :

१) वर्धमान पार्क, स्टेशन रोड

२) दसरा चौक स्टेडियम

३) नगरपरिषद शाळा क्र. ९, शाहूनगर

४) विक्रमसिंह क्रिडागण, नवीन नगरपरिषद इमारतीसमोर

५) दत्त कॉलनी ओपन स्पेस

६) श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ

७) सहकार महर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृह, गल्ली क्र. ६

८) शाहूनगर येथील नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा