![]() |
| प्रा. अंजना संजय चावरे यांचा सत्कार करताना रोटरी चे सर्व मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या वतीने दिला जाणारा "टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड-२०२५" यंदा जयसिंगपूर कॉलेजच्या हिंदी विभागाच्या प्रा.अंजना संजय चावरे यांना प्रदान करण्यात आला.
राज्यातील १२३ शाखांमधून संवाद व संवेदनशीलतेला प्राधान्य देणाऱ्या रोटरी क्लबच्या शिरोळ शाखेतर्फे हा सन्मान करण्यात आला. रोटे. अशोक नाईक (डी.जी.एन. ३१७०) यांच्या हस्ते प्रा.चावरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रोटे. राजेंद्र माळी, के. एम. भोसले , रोटे. चंद्रकांत भाट, अमित जाधव व श्रीकांत माळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे , सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व सदस्य ,प्राचार्य डॉ.सुरत मांजरे सर्व सदस्यांनी प्रा. अंजना चावरे यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी अधीक्षक संजय चावरे, प्रा. स्वाती बस्तवाडे, मित्रपरिवार, नातेवाईक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा