![]() |
| नशाबंदी प्रबोधन रॅली, राष्ट्रीय सेवा योजना आयोजित |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : महात्मा गांधी जयंतीनिमित्त जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) वतीने नशाबंदी प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या हस्ते कॉलेज परिसरात करण्यात आले असून रॅली जयसिंगपूर कॉलेज ते क्रांती चौक या मार्गावर उत्साहात पार पडली.
विद्यार्थ्यांनी “दारूला नाही, जीवनाला होकार!”, “नशा सोडा, आरोग्य जोडा” अशा प्रभावी घोषणा देत शहरवासीयांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. हातातील आकर्षक फलक, घोषणांचा प्रचंड आवाज आणि मुलींची लक्षणीय उपस्थिती ही या रॅलीची वैशिष्ट्ये ठरली.
या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, एन.एस.एस. संचालक डॉ. टी. एम. चौगले यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, प्रा.डॉ. एस. जी. संसुद्धी, कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, प्रा.डॉ. प्रभाकर माने, प्रा. मुकुंद पारिशवाड, प्रा. ऐनापुरे, प्रा. कल्पना पाटील, प्रा. गणेश कुरले या रॅलीत सहभागी होते.
एन.एस.एस. प्रतिनिधी अग्रजा कांबळे व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. या प्रबोधनात्मक रॅलीद्वारे समाजात नशामुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा