![]() |
गूगल इंजिनिअरिंग मॅनेजर भास्कर मंगलापल्ली यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजयराज मगदूम व अन्य मान्यवर |
*प्रशांत वडेर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे ‘टेक स्पार्क २०२५’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देश-विदेशातील नामांकित तंत्रज्ञान कंपन्यांमधील अभियंते व प्रकल्प व्यवस्थापक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गूगल इंजिनिअरिंग मॅनेजर भास्कर मंगलापल्ली, डेल टेक्नॉलॉजिजचे प्रोजेक्ट मॅनेजर अरीन साहू, ऑपटूमचे डेटा इंजिनिअर पृथ्वीराज भोसले, मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर इंजिनिअर अनमोल अरोरा तसेच नोवर्तीसचे डेटा इंजिनिअर जतिन राणा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम होते.
तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कम्प्युटिंग, डेटा इंजिनिअरिंग यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच जागतिक स्तरावर करिअर घडवण्यासाठी कष्ट, सातत्यपूर्ण शिक्षण व कौशल्य विकास किती आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पाहुण्यांनी आपल्या अनुभवांमधून वास्तव उदाहरणे देत उत्तरे दिली. उद्योगविश्वात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास, टीमवर्क व नवोन्मेषी विचारसरणी हे महत्त्वाचे घटक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ‘‘या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भविष्याकरिता नवी दिशा मिळेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांचे प्रोत्साहन लाभले. प्रा. सौरभ खानावले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रोहित माने (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्लब), प्रा. पौर्णिमा माने पाटील (कोडींग क्लब), प्रा. गौसिया देसाई (जी.डी.जी. क्लब) यांच्यासह प्रा. माधुरी जाधव, व्ही. ए. पाटील, एन. बी. पाटील, पी. पी. कदम, प्रा. मोनिका नागावकर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘टेक स्पार्क २०२५’ अत्यंत यशस्वी ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा