Breaking

सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

*छ.शाहू कॉलेजच्या प्रा.माधुरी धनाजी पाटील या आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*

 

प्रा.सौ. माधुरी धनाजी पाटील यांचा नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान व सोबत शिक्षक आमदार जयंत आसगावकर व मान्यवर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : छत्रपती शाहू कॉलेजच्या कार्यशील  प्रा.माधुरी धनाजी पाटील यांना नामदार हसनसो मुश्रीफ फौंडेशन, कागलतर्फे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षिका पुरस्काराने’ गौरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षक आमदार जयंत आसगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार नामदार हसन मुश्रीफ फौंडेशन, कागल च्या वतीने देण्यात आला.


   प्रा. माधुरी पाटील म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात पारंगत आहेत. वाणिज्य शाखेतील या प्राध्यापिका अत्यंत शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे सतत चर्चेत असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. शिक्षणाबरोबरच सामाजिक विषयांवर त्या लोकप्रिय वक्त्या आहेत.

  संस्कारक्षम व समतावादी विचारांची पिढी घडवणे हा त्यांचा जीवनध्यास आहे. कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करत असतानाही त्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या त्या शिवाजी विद्यापीठात व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाच्या पीएच.डी. संशोधक म्हणून कार्यरत असून राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अनेक संशोधनपर लेखनाची नोंद झाली आहे.

    कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र छाप निर्माण केली आहे. संवेदनशील गृहिणी म्हणून कुटुंबाला सर्वोच्च मानत असतानाच सामाजिक कार्यातही त्या तितक्याच सक्रिय असतात. छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी व विविध समाजसुधारकांच्या विचारांचा वारसा जपत त्या भारतीय संविधानाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी कार्यरत आहेत.

    या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांनी प्रा. पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांचे मनस्वी अभिनंदन व  भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा