![]() |
संस्थेचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, प्राचार्य, प्राध्यापकृंद, प्लेसमेंट झालेले विद्यार्थी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ५५ विद्यार्थ्यांची क्यूस्पायडर कनेक्ट, पुणे या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सौरभ खानावळे यांनी दिली.
क्यूस्पायडर ही ई-लर्निंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून उद्योगातील गरजा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अंतर कमी करण्यावर ती लक्ष केंद्रित करते. जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रु. ३ लाखांहून अधिक पॅकेजची ऑफर देण्यात आली आहे.
यामध्ये कम्प्युटर विभागाचे १०, एम.सी.ए.चे २, आय.टी.चे १६, ए.आय.डी.एस.चे १३ व ई.टी.सी. विभागातील १४ विद्यार्थी यांचा समावेश आहे. ॲप्टीट्यूड टेस्ट, गटचर्चा व वैयक्तिक मुलाखत या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झाली.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हाइस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच प्रा. खानावळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामध्ये सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर्स यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे कॉलेजतर्फे सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा