![]() |
मार्गदर्शन करताना डॉ. सोनाली कुरणे, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,डॉ. स्नेहल कुलकर्णी, अशोक शिरगुप्पे व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : नशामुक्त भारताच्या माध्यमातून आनंदी, आरोग्य संपन्न व विचारशील समाज उभा राहू शकतो, असे प्रतिपादन प्रेरक वक्त्या व जायटंस फेडरेशनच्या पदाधिकारी डॉ. सोनाली कुरणे यांनी केले.
नशामुक्त प्रबोधन पंधरवडा व राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना, अंतर्गत तक्रार निवारण समिती व जायटंस ग्रुप ऑफ स्वामिनी सहेली, जयसिंगपूर यांच्या वतीने 'नशाबंदी' या विषयावरील प्रबोधनात्मक व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजर होते. याप्रसंगी जायटंस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. स्नेहल कुलकर्णी व जायटंस ग्रुप ऑफ स्वामिनी सहलीचे उपाध्यक्ष साजिदा घोरी उपस्थित होत्या.
डॉ. कुरणे पुढे म्हणाल्या, नशामुक्त समाजासाठी शाळा, महाविद्यालय, एनजीओ व शासनाने पुढाकार घेऊन राष्ट्रहितार्थ कार्य करावे या असे प्रकाश टाकला, व्यसनमुक्तीसाठीचा स्वानुभव व्यक्त केला.
यावेळी डॉ. स्नेहल कुलकर्णी व संस्थेचे संचालक अशोक शिरगुप्पे यांनी व्यसन मुक्तीच्या गांभीर्याबाबत विवेचन केले.
स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले. उपप्राचार्य प्रा. डॉ. स्मिता महाजन यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, सुनिता शिंदे, वृषाली कोळेकर, आकांक्षा बरडिया, रागिणी शर्मा, कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, डॉ. वंदना देवकर,प्रा. मुकुंद पारिशवाड, प्रा.सुरज चौगुले,प्रा. विश्रांती माने, प्रा.ज्योती चोपडे, प्रा.गणेश कुरले,प्रा. सत्यजित माने, प्रा. राजाराम कांबळे व अन्य प्राध्यापक वृंद, अग्रजा कांबळे व एन.एस.एस.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा