![]() |
*निकिता शहापूरे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूरच्या विद्यार्थ्यांनी वारणानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
शाळेची विद्यार्थिनी कु. योगेश्वरी चव्हाण (१९ वर्षाखालील मुली) हिने बांबू उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून आगामी विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी (रत्नागिरी) निवडली गेली आहे. तर, गोवर्धन कोरे यांनी ४०० मीटर अडथळा शर्यतीत चौथा क्रमांक मिळवला, तर लक्ष्मी घोडके हिने तीन किलोमीटर चालणे स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला.
सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या कौशल्याचा झळा दाखवला.त्यांच्या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप शहारे आणि शुभम झेंडे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल प्राचार्य प्रिया गारोळे, मॅनेजर अभिजीत अडदंडे, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्र व शिक्षकवृंद यांचेकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा