![]() |
| आई वृद्धाश्रमास भेट |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : दीपावली सणाच्या निमित्ताने समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करत डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती येथील राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) युनिट तर्फे ‘आई वृद्धाश्रम’, निमशिरगाव येथे फराळ वाटप करीत हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील निराधार आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करत फराळ व धान्य वाटप केले. तसेच “आपुलकीची भिंत” या सामाजिक उपक्रमाअंतर्गत जयसिंगपूर येथे कपडेही दान करण्यात आले.
डॉ. विजयराज मगदूम (चेअरमन) तसेच डॉ. अँड. सोनाली मगदूम (व्हाईस चेअरपर्सन) यांच्या प्रेरणेतून व कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी वृद्धांसोबत मनमोकळा संवाद साधत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
या प्रसंगी प्रा.मानसी झाडे यांनी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
दिवाळीच्या आनंदात कृतज्ञतेची, आपुलकीची व सेवाभावाची अनमोल किनार जोडणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा