Breaking

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये नवरंग उत्सव व स्त्रीशक्तीचा जागर*




*प्रा. विश्रांती माने : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने “उत्सव रंगांचा – सन्मान स्त्रीत्वाचा” हा प्रेरणादायी कार्यक्रम मंगळवारी उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अंजना चौगुले-चावरे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.

  प्रा.अंजना चौगुले मार्गदर्शन करताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शैक्षणिक, वैचारिक, मानसिक, आर्थिक तसेच बौद्धिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. यावेळी जीवनाच्या पंचसूत्राचे महत्त्व स्पष्ट करताना मानसिक परिपक्वतेचे महत्व अधोरेखित केले. नवरात्रीचा खरा जागर हा शैक्षणिक जागर व्हावा, असे आवाहन ही त्यांनी केले.पालकांशी संवाद ठेवणे, प्रलोभनास बळी न पडणे आणि कोणाच्या भावनांशी खेळू नये या जीवनमूल्यांचा त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.प्रा. चौगुले यांनी विद्यार्थिनींनी नवरात्रीतील नऊ रंगांचे महत्त्व सांगितले. 

   या कार्यक्रमास हिंदी विभाग प्रमुख डॉ. सौ. सुपर्णा संसुद्धी प्रमुख उपस्थित होत्या.स्वागत व प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.  विजयमाला चौगुले यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. वर्षा चौगुले यांनी करून दिली. आभार प्रदर्शन असीम शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन गायत्री पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा