Breaking

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

शालेय क्रीडा स्पर्धेत लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूरचा उत्कृष्ट व दमदार प्रदर्शन


मुख्याध्यापक सयाजीराव पाटील, पर्यवेक्षक सतीश चिपरीकर, सुनील हजारे व क्रीडा शिक्षक व्ही.एम. चव्हाण व यशस्वी विद्यार्थी

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.

   १७ वर्षांखालील गटात उत्कर्षा चव्हाण हिने ४०० मी. धावण्यामध्ये प्रथम क्रमांक, ८०० मी. धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच ४ × ४०० मी. रिले स्पर्धेत शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. या रिले संघामध्ये स्तेफन चौगुले, विनीत कोरे, श्रेणीक पाटणे आणि संस्कार शेंडगे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

   चैतन्य कांबळे याने ३००० मी. धावण्यात तृतीय क्रमांक मिळविला, तर संस्कृती नरदे हिने गोळाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.दरम्यान, शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत साज कांबळे हिने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत सिल्वर मेडल मिळविले.या

        सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. सयाजीराव पाटील यांचे प्रोत्साहन व सहकार्य, तसेच जिमखाना विभाग प्रमुख श्री. सुनील हजारे व क्रीडा शिक्षक श्री. व्ही. एम. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.  आणि पर्यवेक्षक श्री. सतीश चिपरीकर यांचे प्रोत्साहन लाभले. शालेय समितीचे चेअरमन श्री. राजेंद्र मालू, सदस्य श्री. चंद्रकांत जाधव व श्री. प्रसन्ना कुंभोजकर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा