
डी. बी. टी. स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये जागतिक वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्राणीशास्त्र विभागामार्फत वन्यजीवांचे महत्त्व, त्यांना असणारे धोके आणि संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या सप्ताहामध्ये निबंध लेखन, पोस्टर प्रदर्शन, प्रश्नमंजुषा आणि फोटोग्राफी स्पर्धा अशा विविध स्पर्धा व तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली.
सप्ताहाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री परेश परब उपस्थित होते. त्यांनी “वन्यजीव संवर्धनामध्ये बायोटेक्नॉलॉजीचे महत्त्व” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. मानद वन्यजीव संरक्षक श्री रमण कुलकर्णी यांनी “सह्याद्रीतील वन्यजीवन” या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले. तरुण संशोधक नित्या नावेलकर (पणजी) यांनी वन्यजीव छायाचित्रण आणि फोटोग्राफीचे तंत्रज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे होते.प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी उत्तम समन्वय केले. डी. बी. टी. स्टार समन्वयक डॉ. संदीप साबळे आणि प्रभारी समन्वयक डॉ. सुरज उमडाळे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. स्मिता महाजन,डॉ. स्वप्निल पोवार, विकास जाधव, अर्चना धांदले व धनश्री खडके यांनी विशेष परिश्रमा घेतले.
प्राचार्य डॉ.मांजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.ईश्वर मठपती यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौंदर्य पाटील आणि सानिका जगताप यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा