Breaking

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

डॉ.जे. जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एनएसएस डे उत्साहात साजरा

 

एन.एस.एस. डे साजरा करताना मान्यवर

गितांजली जाधव : विशेष प्रतिनिधी 


जयसिंगपूर : डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) युनिट २०२५ चे उद्घाटन व एन.एस.एस. दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. पी. एस. पांडव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील होत्या.

   डॉ. पांडव यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले.प्रा. पी. पी. पाटील यांनी स्वागत केले, तर प्रा. पी. ए. चौगुले यांनी एन.एस.एस.च्या उद्दिष्टांची व कार्यपद्धतीची माहिती दिली.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हा. चेअरपर्सन डॉ. ऍड. सोनाली मगदूम आणि कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले.

    या कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डॉ. ए. एम. मोरे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा