Breaking

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न: डॉ. कलाम यांच्या ज्ञानसाधनेला अभिवादन*

 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : विश्वविख्यात शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर येथे बुधवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

   कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्रा. योगेश बदामे आणि एस. के. शेटे यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या ज्ञानसाधनेला आणि कार्याला अभिवादन केले.

   या प्रसंगी प्रा. सुरज चौगुले यांनी डॉ. कलाम यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडत, ते आजच्या युवकांसाठी कसे आदर्श आणि स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व आहेत, यावर प्रकाश टाकला. तसेच कु. चौगुले, सुशांत कांबळे आणि एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी ‘वाचन प्रेरणा’विषयक निवडक मजकुराचे प्रकटपणे वाचन केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान IQAC समन्वयक प्रा. डॉ. तुषार घाटगे यांनी भूषविले. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

   कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र कोळी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

    या वेळी प्रा. डॉ.शशांक माने,प्रा. दीपक जनवाडे, प्रा. गणेश कुरले, प्रा. सत्यजित माने तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा