![]() |
| सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जयसिंगपूर शहरात तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. लोकशाहीचा आत्मा जपणाऱ्या न्यायसंस्थेवरील अशा हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, हा प्रकार न्यायव्यवस्थेवरील थेट आघात असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी कॉम्रेड रघुनाथ देशिंगे, डॉ. चिदानंद आवळेकर,ॲड.घाटगे,प्रा. सुरेश भाटिया यांनी तीव्र शब्दात निषेधात्मक मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत उर्फ बंडा मणियार, आम आदमी पार्टीचे सुदर्शन कदम,आदम मुजावर,शोक घोरपडे, माजी मुख्याध्यापक अशोक शिरगुप्पे , इब्राहिम बागवान,प्रा. शांताराम कांबळे,इकबाल सुदरणे ,अमित वाघवेकर, सचिन कांबळे यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर तलाठी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
या वेळी कार्यकर्त्यांनी ‘न्यायसंस्था अभेद्य आहे’, ‘भ्याड हल्ले थांबवा’, ‘गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. निषेधकांनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
न्यायसंस्था ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तिच्या सन्मानासाठी सर्व नागरिकांनी एकजूट दाखवावी, असा संदेशही या आंदोलनातून देण्यात आला.जयसिंगपूरकरांनी व्यक्त केलेल्या या ठाम भूमिकेमुळे न्यायसंस्थेबद्दलचा आदर आणि लोकशाहीवरील विश्वास अधोरेखित झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा