Breaking

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये दुर्मिळ मोडी–फारसी कागदपत्रांचे प्रदर्शन व मोडी लिपी कोर्सचे उद्घाटन*


दुर्मिळ कागदपत्रे व नाणी प्रदर्शन उद्घाटन करताना प्रा. आप्पासाहेब भगाटे, प्राचार्य डॉ.मांजरे, राजेंद्र खुरपे, अन्सार पटेल व प्रा. सुरज चौगुले


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या इतिहास विभागाच्या वतीने कॉलेजच्या ग्रंथालयात शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर 2025 रोजी दुर्मिळ मोडी आणि फारसी कागदपत्रांचे भव्य प्रदर्शन तसेच मोडी लिपी प्रमाणपत्र कोर्सच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले.


      या प्रदर्शनामध्ये इतिहासप्रेमी राजकुमार खुरपे यांनी संकलित केलेली भारत व पाकिस्तानातील विविध संस्थानांमधील स्टॅम्प कागदपत्रे—मोरवी, जुनागड, राजकोट, जंजिरे, जत, फलटण, जमखंडी, कुरुंदवाड, मिरज, तासगाव, सांगली, भोर, औंध, खैरगड आदी संस्थानांची—प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. तसेच कुरुंदवाडचे अन्सार पटेल यांनी जतन केलेल्या दुर्मिळ नाण्यांचाही समावेश करण्यात आला.

      यावेळी मोडी लिपी प्रमाणपत्र कोर्सचे  उद्घाटन कॉलेजचे संस्थेचे सदस्य प्रा. आप्पासाहेब भगाटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते, तर मोडी तज्ञ म्हणून प्रा. चंद्रशेखर काटे (शिवाजी विद्यापीठ) उपस्थित होते.या वेळी प्रा. भगाटे यांनी दुर्मिळ हस्तलिखितांचे जतन आणि नांदणी मठातील साधनसंपत्तीचा परिचय करून दिला. प्राचार्य मांजरे यांनी मोडी व फारसी कागदपत्रांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यातून निर्माण होणाऱ्या करिअर संधी आणि मोडीवाचकांची वाढती गरज यांवर भाष्य केले.

    कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सुरज चौगुले व पाहुण्यांचा परिचय प्रा. राजाराम कांबळे यांनी केला.तर आभार प्रा. अमोल पवार यांनी मानले. 

    या प्रदर्शनाला ग्रंथपाल प्रा.डी.एस. बामणे,प्रा.डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर, प्रा. गणेश कुरले, प्रा. सत्यजित माने, अधीक्षक संजय चावरे, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व मान्यवरांनी भेट दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा