Breaking

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

*डॉ.मगदूम इंजीनियरिंगमध्ये फायलिंग ऑफ पेटंट्सवरती चर्चासत्र संपन्न*


डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग 


*शाहिद सय्यद : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या आर.एन. डी.विभाग व मायक्रॅव्ह कन्सल्टन्सी सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने " फायलिंग ऑफ पेटंट्स "या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.

     सध्याच्या औद्योगिक व तंत्रज्ञान युगात संशोधनास महत्त्व आले आहे. नवीन संशोधनातून मानवी व तंत्रज्ञानात्मक नवीन संशोधनासाठी कमीत कमी संसाधनाचा वापर करून यशस्वी संशोधन कसे करता येईल या विषयावरती चर्चासत्रामध्ये विवेचन करण्यात आले. पेटंट फाईल कसे करायचे, प्रोजेक्टची कॉलिटी कशी वाढवायची  याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.

      ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांच्या सहकार्याने व कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्या डॉ. एस.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी. पी. बेळगली यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रम यशस्वी झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा