![]() |
| अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक कदम, भास्करदादा शेटे, राजेंद्र मालू व मुख्याध्यापक सयाजीराव पाटील व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिक्षणातील गुणवत्तेला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर येथे गुणवंत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक पटकावणारे विद्यार्थी, तसेच ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यधारक, ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत A ग्रेड प्राप्त विद्यार्थी, NMMS शिष्यवृत्ती धारक, CATC 323 NCC कॅडेट्स, आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी अशा विविध क्षेत्रांत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून मा.आण्णासाहेब जाधव (अप्पर पोलिस अधीक्षक, गडहिंग्लज-कॅम्प इचलकरंजी चे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. परिश्रम आणि सातत्य हेच जीवनात प्रगतीचे खरे साधन आहे.”कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन मा.राजेंद्र मालू यांनी भूषविले.
या कार्यक्रमाला जयसिंगपूर पोलिस निरीक्षक कदम साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते मा. भास्करदादा शेटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सयाजीराव पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक सतीश चिपरीकर यांनी करून दिला. बक्षीसपात्रांचा अहवाल सतीश भोसले यांनी सादर केला, तर सुनील हजारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कुंभार यांनी केले.
या प्रसंगी स्कूल कमिटी व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक-शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा