![]() |
| सायकल वाटप करताना सर्व मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर येथे रोटरी क्लब, जयसिंगपूर यांच्या वतीने ६० पेक्षा अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष मा. सुदर्शन एडवान,सुदर्शन कदम व युवराज शहा उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन मा. राजेंद्र मालू होते. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सायकलचे महत्त्व आणि फायदे विशद केले.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक मा. सयाजीराव पाटील यांनी केले, तर रोटरी क्लब अध्यक्ष मा. सुदर्शन एडवान यांनी प्रास्ताविकातून रोटरी क्लबच्या सामाजिक कार्यांचा आढावा घेतला. या उपक्रमाची माहिती आणि उद्देश जेष्ठ शिक्षक श्री. संजय सुतार यांनी सविस्तर सांगितले.
कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक एस. एल. चिपरीकर यांनी मानले. यावेळी मा. राजेंद्र चौगुले, मा. रुस्तूम मुजावर, मा. गौतम झेले, तसेच रोटरी क्लबचे सदस्य, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, रोटरी क्लबच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा