Breaking

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

*अनेकांत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश*

 

मा.अभिजीत अडदंडे, प्राचार्या प्रिया गारोळे, क्रीडा शिक्षक व यशस्वी विद्यार्थी


*प्रा. गणेश कुरले : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर:  अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर च्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे.शाळेतील लक्ष्मी घोडके(चालणे,प्रथम) ,योगेश्वरी चव्हाण (बांबू उडी, प्रथम; तिहेरी उडी, द्वितीय) , गोवर्धन कोरे (400 मी, द्वितीय) ,संनिधी मगदूम (गोळा फेक, द्वितीय) ,आरोही मगदूम (थाळीफेक, द्वितीय) असे घवघवीत यश मिळवून या सर्वांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या सर्वांची निवड झालेली आहे. तसेच आराधना पवार, लक्ष्मी घोडके, योगेश्वरी चव्हाण, कोमल शर्मा (4*100 मी ) आणि आराधना पवार,कोमल शर्मा, दीपिका चौधरी, अनन्या गायकवाड (4*400 मी ) यांनी रिले मध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. 

     सर्वच खेळाडूंनी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम कामगिरी बजावलेली असून त्यांना क्रीडा शिक्षक संदीप शहारे आणि शुभम झेंडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल बद्दल संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य व सर्व घटकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा