Breaking

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

*गणपतराव दादा पाटील यांची घराघरात धडक ; जयसिंगपूर विकासाच्या शाश्वतीमुळे जनतेत उत्साहाची नवी लाट*


उमेदवारांचा प्रचार करताना ज्येष्ठ नेते गणपतराव दादा पाटील 



*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  शहरात आज राजकीय उत्साहाला नवचैतन्य देणारी घटना घडली.ज्येष्ठ नेते गणपतराव दादा पाटील यांनी पायी प्रचारात सहभाग घेऊन उमेदवारांना भक्कम साथ दिली. वार्ड क्रमांक १, ४ आणि ५ मधील राजीव गांधीनगर परिसरात घराघरांत जाऊन जनतेशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि योग्य तो विकास करून दाखवण्याची छाती ठोकपणे हमी दिली.

    गणपत दादा पाटील म्हणाले, यावर्षी जर नागरिकांनी आमच्या उमेदवारांना संधी दिली तर जयसिंगपूरचा खरा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्यक्षात दाखवू. यासाठी माजी खासदार राजू शेट्टी व माधवराव घाटगे यांचे उत्तम नेतृत्व या आघाडीला लाभले आहे.

     प्रचारादरम्यान नेत्यांनी शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याची ‘ब्ल्यू प्रिंट’ मतदारांसमोर मांडली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, शिक्षण व आरोग्य अशा मूलभूत गरजांवर अधिक भर देत आधुनिक सुविधांचे शहर बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

    ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांची ऊर्जा आणि नेतृत्व पाहून मतदारांच्या चेहऱ्यावर विश्वास, समाधान आणि अपेक्षांचा उजाळा दिसून आला.

    उमेदवारांनी जनतेच्या सुरक्षिततेची व प्रामाणिक सेवक होण्याची हमी दिली.

    अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, जनता, विकास आणि सुरक्षितता ही तीनही क्षेत्रे प्राधान्याने हाताळली जातील. “विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” अशी भूमिका याप्रसंगी उमेदवारांनी मांडली.या प्रभावी पायी प्रचार दौऱ्यात अनेक उमेदवार व पदाधिकारी सहभागी झाले होते.


 सुदर्शन कदम – नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

1) समशुद्दीन अलीसो सय्यद – नगरसेवक पदाचे उमेदवार

2) सोनाली नंदकुमार कदम – नगरसेवक पदाचे उमेदवार

3) प्रदीप आनंदा गायकवाड – नगरसेवक पदाचे उमेदवार

4) मुक्ताबाई बाळासो वगरे – नगरसेवक पदाचे उमेदवार

5) सागर बापू माने – नगरसेवक पदाचे उमेदवार

6) संजना संजय शिर्के (वैदु) – नगरसेवक पदाचे उमेदवार

   तसेच जयसिंगपूर विकास आघाडीचे अनेक नेते व समर्पित कार्यकर्ते सहभागी झाले होते.

     या प्रचारात अनुभवी नेतृत्व, स्पष्ट विकास आराखडा आणि जनतेशी थेट संवाद यामुळे जयसिंगपूरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आमच्या उमेदवाराच्या  दिशेने मतदारांचा कल सकारात्मक होत असल्याची माहिती जयसिंगपूर विकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा