Breaking

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

“नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपुरात पोलिसांचे दमदार पथसंचलन”

 

 नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पथसंचलन 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी आज शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य पथसंचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन पार पडले.

  पथसंचलनाची सुरूवात जयसिंगपूर पोलीस ठाण्यापासून झाली. त्यानंतर राजीव गांधीनगरातील गोसावी गल्ली, इराणी वसाहत, खामकर मळा, वैदू गल्ली, तसेच गल्ली क्रमांक 6, 7, 8, 9 या भागांतून संचलन पुढे सरकले. शाहूनगर येथील जयमहाराष्ट्र चौक, सुदर्शन चौक, बावन्न झोपडपट्टी, संभाजीनगर, जयसिंगनगर मार्गे हे पथसंचलन नांदणी रस्ता परिसरात संपन्न झाले.

     या दरम्यान विविध गुन्ह्यातील संशयित आरोपींची तपासणी, तसेच अवैध वाहनांवर कारवाई करण्यात आली. संचलनात जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे चार अधिकारी, १५ स्ट्रायकिंग पथक, २० पोलीस कर्मचारी, आरसीबी व्हॅन तसेच सहा चारचाकी वाहनांचा समावेश होता.

        निवडणूक काळात सुरक्षेचा धोकादायक परिस्थिती  निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांचे हे पथसंचलन नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा दृढ विश्वास निर्माण करणारे होईल अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा